हेल्दी पीपल्स क्बल ••
नवराष्ट्र
एचपीके ॲग्रो प्रॉडक्टची यशस्वी वाटचाल; हेमांगी व प्रदीप पवार यांच्या व्यवसायाची कहाणी
शेतकऱ्यांना बाजारपेठ, आरोग्यदायी उत्पादने
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. ग्रामीण भागात दर्जेदार उत्पादने काढणारे शेतकरी बाजारपेठेअभावी नुकसान सहन करत आहेत, तर दुसरीकडे शहरी ग्राहक दर्जेदार उत्पादने मिळत नसल्यामुळे आरोग्याचे नुकसान करून घेत आहे. उपलब्धता आणि मागणी यांची सांगड
घातली तर ‘हेल्दी पीपल्स क्बल’ तयार होऊ शकेल हा विचार अडीच वर्षांपूर्वी मनात डोकावला आणि प्रदीप व हेमांगी पवार या दाम्पत्याची ‘एचपीके’ अँग्रो प्रॉडक्ट ही कंपनी सुरु झाली. सगळीकडे लॉकडाऊन असतानाच्या काळात पवार दाम्पत्याच्या डोक्यात व्यवसाय सुरु करण्याचा भन्नाट विचार आला.
टेलिकॉम क्षेत्रात केले काम
बारा वर्षांपेक्षा अधिक काळ टेलिकॉम आणि विमा क्षेत्रात कार्पोरेटमध्ये काम केलेले प्रदीप यांनी वेगळा व्यवसाय सुरु करण्याचे धाडस दाखविले आणि त्या धाडसाला त्यांची पत्नी हेमांगी यांची साथ लाभली. कोरोना काळात काहीतरी नवे करावे, असा विचार मनात आला आणि शेतीशी संबंधित काही करावे असे ठरले. मला शेतीचा वारसा आहे. वाईजवळ गुळूम हे आमचे गाव, प्रदीप सांगत होते.
हळदीला चांगली मागणी दगडी पाटा-वरवंट्याला मागणी रसायनमुक्त तेल, तूप
दगडी जात्यावर दळलेल्या हळदीचा सुगंध, रंग आणि चव वेगळी असते. त्यातील पोषक तत्व कायम असतात. आम्ही एचचीकेच्या माध्यमातून वाईची हळद उपलब्ध करून दिली. लोकांना त्याबाबत कळले, सोशल मिडियावर जाहिरात केली. ज्यांनी एकदा हे उत्पादन वापरले, त्यांनीच त्याचे पुढे मार्केटींग केले. हळदीला खूप चांगली मागणी
वाढली. त्यासोबतच गुळ उपलब्ध करून
दिला. वेगवेगळ्या चवीच्या गुळाला खूप मागणी आहे. हळद, गुळ आम्ही स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतो. दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या शेतकन्यांशी करार केले आहेत, असे प्रदीप पवार म्हणाले.
Mumbai Plus Edition.
25 November 2023 Page No. 2 epaper.navarashtra.com
कोरोना काळात त्यांना मदत म्हणून त्यांच्याकडून एकाचवेळी दहा पाटे वरवंटे विकत घेतले. परिचितांना भेट देता येतील हा उद्देश होता. पण या वस्तुंना प्रदर्शनात आणि ऑनलाईन भरपूर मागणी आहे. शहरातील फ्लॅटच्या आकारमानानुसार आम्ही थोडे लहान आकाराचे पाटे वरवंटे, खलबत्ते तयार करून घेतले. त्यांना खूप मागणी आहे, असे हेमांगी पवार सांगतात.
तेल आणि गायीचे तूप रसायनमुक्त असणे फार आवश्यक आहे. एचपीकेने ते उपलब्ध करून दिले आहे. आम्ही आमच्या सगळ्या उत्पादनांना नॅचरल म्हणतो. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण करणे जमत नाही. त्यामुळे उगाच सेंद्रीय म्हणून मार्केटींग करण्याऐवजी आम्ही नॅचरल म्हणतो.
रसायनमुक्त अन्न खाण्याबाबत मोठ्यास प्रमाणात जनजागृती
आपल्या अन्न पदार्थांचा परिणाम आरोग्यावर होतो, हे स्पष्ट आहे. आपण जे खातो त्यामुळे कर्करोग, मधुमेह आणि इतर समस्या उद्भवतात. त्यामुळे रसायनमुक्त अन्न खाण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. आम्ही अनेक प्रदर्शनांमध्ये जातो, आमच्या उत्पादनांचे स्टॉल्स लावतो. त्याठिकाणी पहिले आरोग्याबाबत जनजागृती करतो. त्यानंतर आमच्या उत्पादनांचे महत्व लोकांना आपोआप पटू लागते. परळच्या भगिनी मंडळाच्या प्रदर्शनात अशी पहिली संधी मिळाली.


